कमकुवत झालेला ’आधार’
युपिए सरकारने गॅस च्या सिलिंडर्सवरचे अनुदान वाढवतानाच एक दुसरा मोठा वाईट निर्णय घेतला तो म्हणजे अनुदान आणि ’आधार’ यांची फारकत करण्याचा. अनुदान देताना ते पात्र आणि खऱ्या लाभधारकाच्याच पदरात पडते आहे हे नक्की करण्यासाठी आधारचा मोठा आधारच सरकारला मिळाला असता. पण तसे झाल्यास सरकारी अनुदाने खोट्या, अपात्र लाभधारकांच्या नावावर दिल्याचे दाखवत ते लाटणाऱ्या वर्गाची कमाई बंद झाली असती. आणि त्यासाठीच आधार योजना बारगळावी असा त्या वर्गाचा प्रयत्न होता. भ्रष्टाचाऱ्यांना जे हवे ते देणारा युपिए सरकारचा हा निर्णय म्हणजे अनुदानाच्या गळतीला सरकारने दिलेली मान्यताच असे म्हणावे लागेल.
या निमित्ताने आधार योजनेचा अढावा घेणे उचित ठरेल. आधार योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाला स्वतःची ओळख पटविण्यासाठी एक क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच आधार कार्डावर त्याची ओळख पटविणारी माहिती जसे अंगठ्याचा ठसा, बुबुळाची प्रतिमा नव्या तंत्रज्ञानाद्वारे छापलेली असेल. ह्या मुळे एका नगरिकाला एकच क्रमांक आणि एका क्रमांकाचा, ओळखिचा एकच नागरिक अशी गाठ कायमची मारण्यात येणार आहे. आधार हा काही नागरिकत्वाचा पुरावा नाही. आधार योजनेवर काही आक्षेप घेण्यात येतात. त्यांचा विचार आपण करुयात.
आधार योजनेत नागरिकांची जी माहिती गोळा करण्यात येत आहे तिच्या सुरक्षेविषयी काही रास्त शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. जसे नागरिकांच्या गोळा केलेल्या माहितीचा दुरुपयोग तर होणार नाही ना? ह्याचे स्पष्ट उत्तर आधार प्रकल्पाचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी दिलेले आहे. प्रत्येक नागरिकाची गोळा केलेली माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून एनक्रिप्ट केल्या जाते. अशा तऱ्हेने एनक्रिप्ट केलेली माहिती विशिष्ट डिक्रिप्शन सॉफ्टवेअर असल्याशिवाय वाचता येत नाही. तसेच गोळा केलेल्या माहितिच्या सुरक्षेसाठी आवष्यक त्या साऱ्या उपाय योजना केलेल्या अहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि आज जेंव्हा बँकांचे व्यवहार निर्धोकपणे संगणकाच्या माध्यमातुन होत आहेत तेंव्हा सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेतलेली असता आपल्या माहितीचा गैर वापर होईल ही भिती निराधार वाटते.
आधार योजनेवरचा दुसरा आक्षेप म्हणजे तीवर होणारा खर्च. तो फुगवून रु. ७०,००० कोटी येवढा जास्त असल्याचा आरोप काही जण करतात. पण आधारचे संचालक राम सेवक शर्मा यांनी स्पष्ट शब्दात तो खर्च रु. १८,००० कोटींपेक्षा जास्त नसल्याचे सांगितले आहे. पण आधारचा वापर जर सरकारची अनुदाने देताना लाभधारकाची ओळख पटविण्यासाठी करण्यात आला तर अनुदानाच्या गळतीमधून होणारे नुकसान थांबवून आधार मुळे फायदाच होईल हे दाखवून देता येईल.
अन्न सुरक्षा योजनेवर सरकार १,३०,००० कोटी रुपए येवढा खर्च करणार असल्याचे सरकारी आकडे सांगतात. नोव्हेंबर मधे केंद्रिय मंत्री के.व्ही.थॉमस यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींसमोर स्वस्त धान्य योजनेतुन २५-३०% येवढी गळती होत असल्याची कबूली दिली होती. म्हणजे अन्न सुरक्षा योजनेवर होणाऱ्या खर्चापैकी निदान तीस हजार कोटी रुपये येवढी गळती होईल असे मानणे वाजवी ठरेल. ही जी गळती आहे ती खोट्या लाभधारकांच्या नावाने अनुदान लाटल्या मुळे तसेच वैध लाभधारकाच्या नावाचे धान्य त्याला न देता ते खुल्याबाजारात वळवून होत असते. जर लाभधारकाची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डाचा वापर केला गेला तर ही गळती थांबवता येईल. कारण त्या मार्गाने खोटे लाभार्थी उभे करणे शक्य होणार नाही तसेच खऱ्या लाभार्थीला लाभा पासून वंचित ठेवता येणार नाही. ही गळती थांबवू शकणाऱ्या आधार योजनेवर होणारा खर्च वाजवी आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात शिक्षणावर २७,००० कोटी रुपए दर वर्षी खर्च होतात. आपल्या राज्यात २०% पेक्षा जास्त विद्यार्थी ’बोगस’ असल्याचे सरकारी पाहणीत दिसून आले आहे. जर विद्यार्थ्यांची, शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी तसेच त्यांची ओळख पटविण्या साठी आधार कार्डांचा वापर करण्यात आला ह्या ’बोगस’ विद्यार्थ्यांवर होणारा खर्च जो दर वर्षी पाच हजार कोटी रुपयां येवढा असेल तो वाचवता येईल!. प्रत्येक राज्यातुन जर हेच करण्यात आले तर आधार योजनेवरचा खर्च केवळ ’बोगस’ विद्यार्थ्यांवर होणाऱ्या खार्चातुनच करता येईल!
आधारवरचा अजुन एक आक्षेप असा आहे की परकिय नागरिकही आधार कार्ड मिळवू शकतात. हे खरे आहे. पण केवळ त्यामुळे आधार योजनाच रद्द करा हे म्हणणे मान्य करता येत नाही कारण परकिय नागरिक वाहन चालकाचा परवाना, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळख पत्र ई.ई सगळॆच मिळवू शकतात म्हणुन काय ती सारी ओळखपत्रे देणे बंद करावे? नागरिकत्व सिध्द करण्यासाठी वेगळ्या मार्गांचा अवलंब करणे जास्त संयुक्तिक ठरेल. तसेच एकदा सर्व भारतियांना आधार कार्ड मिळाले की त्यानंतर कुणाही परकिय नागरिकाला घुसखोरी करता येणार नाही हे स्पष्ट आहे. काही परकिय घुसखोर आधार कार्डाचा गैर वापर करू शकतात हे जरी मान्य केले तरी दुसऱ्या कोणत्याही ओळख पटविण्याच्या मार्गा पेक्षा एका व्यक्तिला एकच ओळख आणी एका क्रमांकाची एकच व्यक्ती हे निश्चित करणारे आधार कार्ड हाच मार्ग जास्त भरवश्याचा आहे असे मानण्यास काही हरकत नाही.
अनुदान देण्यासाठी जर आधार कार्डांचा वापर करण्यात आला तर अनुदानाची गळती थांबवण्यात येईल हे स्पष्ट आहे. राजस्थानत रॉकेल वितरणासाठी आधार कार्डाचा वापर करून ८०% येवढे रॉकेल, जे काळ्याबाजारात जात होते ते वाचवण्यात आले. हैदराबाद मधे रेशन कार्डासोबत आधारची ओळख अनिवार्य केल्यावर हजारो बोगस रेशनकार्डे रद्द करण्यात आली या उदाहरणांवरून आधार योजनेची परिणामकारताच लक्षात येते. सर्व अडचणिंवर मात करत जवळपास ६० कोटी आधर कार्डे वितरित केल्याचे आधार विभागाचे म्हणणे आहे. लवकरच देशातल्या प्रत्येकालाच एक आधार कार्ड मिळू शकते. तसे झाल्यास अनुदाने लाटून भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. आणि म्हणुनच आधार कार्ड वितरीत करण्याची योजना असफल व्हावी असाच ह्या भ्रष्ट गटाचा प्रयत्न आहे. दुर्दैवाने सिलिंडर्सच्या अनुदानासाठी आधार कार्डे अनिवार्य न करण्याचा निर्णय घेवून युपिए सरकारने त्या पुढील प्राधान्य भ्रष्टाचार संपवण्यास नसून भ्रष्टाचाऱ्यांचीच पाठराखण करण्याचे असल्याचे दाखवून दिले आहे. जनतेच्या कल्याण्यासाठी राबत असल्याचे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणाऱ्या युपिए सरकारने आपण भ्रष्टाचाऱ्यांच्याच बाजुचे आहोत हेही दाखवून दिले आहे.